99 लाखांची या कंपनीची शानदार एसयुव्ही लाँच

लेक्सस कंपनीने आपली RX450hL लक्झरी एसयुव्ही भारतात लाँच केली आहे. कंपनीने या कारची किंमत 99 लाख रूपये (एक्स शोरूम) ठेवली आहे. नवीन लेक्सस RX450hL हे RX450h या कारचे सात सिटर व्हर्जन आहे.

(Source)

या एसयुव्हीमध्ये BS6 कॉम्पलियेंट V6 3.5 लिटर इंजिन देण्यात आलेले आहे.  V6 Atkinson Cycle इंजिनमध्ये ड्युल VVT-i आणि अँडवांस्ड D-4S फ्युल इंजेक्शन सिस्टम आहे. जे हायटेक प्रदर्शन क्षमता, हायटेक फ्युल एफिशिएंसी आणि कमी उत्सर्जन निर्माण करत शानदार प्रदर्शन करते.

(Source)

लेक्सस इंडियाचे प्रेसिडेंट पी बी वेणुगोपाळ म्हणाले की, आरएक्स450एचएल एक सेल्फ चार्ज हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हिकल आहे. जी लग्झरी डिझाईन, जास्त जागा, शांत वातावरण आणि क्राफ्टमॅनशीप प्रदान करते.

या एसयुव्हीला शानदार बनवण्यासाठी यात डिस्टन्कटिव 3-आय, एनर्जी-एफिशिएंट एल-शेप्ड एलईडी लँप, इंटीग्रेटिड एलईडी डीआरएल देण्यात आले आहे.

(Source)

इतर फिचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये रिमोट टच इंटरफेस, नवीन टच-डिस्प्ले स्क्रीन, फोन होल्डर, यूएसबी पोर्ट, सिस्टम नेटिव क्लाउड कनेक्शन देखील मिळेल.

 

Leave a Comment