विद्यार्थी, स्वयंरोजगार आणि बेकारही घेऊ शकतात क्रेडीट कार्ड


आजच्या युवा पिढीत, शहरी भागात क्रेडीट कार्ड लोकप्रिय झाली आहेत. मात्र क्रेडीट कार्ड सहजासहजी मिळणे कठीण असते. त्यातही विद्यार्थी, स्वयंरोजगारी आणि बेरोजगार, नव्याने नोकरी लागलेले पण ज्यांची काही क्रेडीट हिस्ट्री नाही अश्या लोकांना क्रेडीट कार्ड मिळविणे अधिक अवघड असते. मात्र या सर्वाना आता त्यांच्या गरजेनुसार क्रेडीट कार्ड मिळू शकते.

क्रेडीट कार्ड देताना बँका अथवा क्रेडीट कार्ड कंपन्या संबंधित माणूस ते पैसे भरू शकतो का याचा प्रामुख्याने विचार करतात. मग तो माणूस बेकार असेल, विद्यार्थी असेल वा अन्य कुणी. त्याच्याकडे पैसे मिळण्याचा स्रोत आहे असे दिसले की बँका क्रेडीट कार्ड देतात.

एखाद्याला भाडे उत्पन्न असेल, एफडी असतील, आरडी असेल, एखादा फ्री लान्सिंग करत असेल किंवा ट्रस्टच्या माध्यमातून कुणाला पैसे मिळत असतील तर क्रेडीट कार्ड मिळू शकते. आज अनेक बँका शिक्षण सुरु असलेल्या विद्यार्थ्यांना क्रेडीट कार्ड देत आहेत. या कार्डची लिमिट कमी असली तरी विद्यार्थ्याच्या गरजा त्यातून पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थी क्रेडीट कार्डवर काही फायदे म्हणजे त्याचे व्याज कमी असते आणि क्रेडीट कार्ड सुरु करणे किंवा रिन्युअल साठी फी मध्ये सुट मिळते.

अॅड ऑन कार्ड हे क्रेडीट कार्डचे अॅडिशनल कार्ड आहे. प्रायमरी कार्ड बरोबर ते जारी केले जाते. जवळचे नातलग, आई वडील अथवा १८ वर्षांखालील अपत्ये यांच्यासाठी असे कार्ड घेता येते. एखादा बेरोजगार आहे, त्याला स्वतःचा इन्कम नाही मात्र परिवारात प्रायमरी कार्ड असेल तरी त्यांना अॅड ऑन कार्ड मिळू शकते. काही बँका आजकाल एफडी वर क्रेडीट कार्ड देतात. म्हणजे जे ग्राहक या बँकेत एफडी करतील त्यांना क्रेडीट कार्ड मिळू शकते. याला सिक्युअर क्रेडिड कार्ड असे म्हटले जाते. ज्यांना कायम नोकरी नाही ते असे कार्ड घेऊ शकतात.

Leave a Comment