म. गांधीनी वापरली होती ही ऐतिहासिक कार


राष्ट्रपिता म. गांधी यांची १५० वी जयंती देशभर साजरी झाली. म. गांधी यांची राहणी अगदी साधी होती आणि ते त्यांचे जीवन अतिशय साधेपणाने जगत असत. स्वातंत्र्य आंदोलनात ठिकठिकाणी त्यांना सभा घेण्यासाठी जावे लागे तेव्हा ते कार वापरत असत. अर्थात त्यावेळी देशात कार्सची संख्या अगदीच कमी होती. ऑटो इतिहासात सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी फोर्डची मॉडेल टी या कारचे महत्व वेगळे आहे कारण काही खास प्रसंगी गांधीजी ही कार वापरत असत. आजही ही कार संग्रहालयात जतन केली गेली आहे.

बरेली मध्यवर्ती तुरुंगातून सुटका झाल्यावर गांधीजी एका विशाल सभेत १९२७ साली याच कार मध्ये बसून गांधीजीनी धरणे धरले होते. आज ही कार विंटेज कार म्हणून जतन केली गेली आहे. या कारचा वापर गांधीजीनी अनेक वेळा केला होता. तसेच एक जुनी स्टडबेकर प्रेसिडेंट कार गांधीजीनी कर्नाटक दौऱ्याच्या वेळी वापरली होती. हा दौरा स्वातंत्र मिळण्यापूर्वी केला गेला होता. ही फर्स्ट जनरेशन स्टडबेकर १९२६ ते १९३३ या काळात बनविली गेली होती.

स्वातंत्र आंदोलनात बरेच वेळा महात्माजी सफेद पॅकार्ड कारचा वापर करताना दिसले होते. ही कार उद्योगपती घनश्याम बिर्ला यांची होती. १९४० च्या दशकाच्या सुरवातीची ही कार होती. तसेच भारतीय व्यापारी आणि दिल्ली क्लॉथ अँड जनरल मिल्सची संस्थापक सर् श्रीराम यांच्य्ही पॅकार्ड कारमधून गांधीजी कधी कधी प्रवास करत असत.

Leave a Comment