बुसान फिल्म फेस्टिव्हल, ए आर रेहमान देणार लाईव्ह परफॉर्मन्स


गुणी संगीतकार आणि आता ९९ सॉंग्ज चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात उतरत असलेला गुणी संगीतकार ए. आर. रेहमान येत्या ९ ऑक्टोबर ला बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये या चित्रपटाचा प्रीमियर होण्यापूर्वी लाइव परफॉर्मन्स देणार असल्याचे समजते. या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वेश कृष्णमूर्ती यांनी केले असून या संदर्भात बोलताना रेहमान म्हणाला, या चित्रपटात संगीत हा कहाणीचा मुख्य भाग आहे आणि हे संगीत प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष सादर करण्यापासून मी स्वतःला आवरू शकलो नाही. मला प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहायची आहे.

या प्रोजेक्ट साठी चार वर्षे लागली असे सांगून रेहमान म्हणाला या चित्रपटासाठी मी १००० जणांच्या ऑडीशन घेतल्या. अखेरी इहान भट्ट आणि एदिल्सी वर्गीस यांची निवड मुख्य भूमिकेसाठी केली गेली असून त्याच्यासोबत बसून चित्रपटाचे स्क्रिप्ट तयार केले आहे. ए. आर रेहमान प्रोडक्शन हाउसचा हा पहिला चित्रपट आहे. याची कहाणी एका युवकाची आहे ज्याला एक यशस्वी संगीतकार बनायचे आहे. त्यामुळे ही कहाणी रेहमान याच्यासाठी विशेष जवळची आहे.

Leave a Comment