ट्रम्प बुवांना मेक्सिको सीमेवर हवेत साप, मगरी


अमेरिकेत शेजारील मेक्सिको मधून बेकायदा घुसणारे लोक आणि अमली पदार्थ यावर नियंत्रण आणण्यासाठी सीमेवर भिंत बांधण्याची काम हाती घेतले गेले आहे. मेक्सिको मधून अमेरिकेत होणारी घुसखोरी हा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी इतका बेचैनीचा विषय आहे की भिंतीचे संरक्षण करण्यासाठी ट्रम्प यांनी काही कल्पना सुचविल्या होत्या असे वृत्त न्युयॉर्क टाईम्सने दिले आहे.

त्यानुसार जेव्हा व्हाईट हाउसच्या ओव्हल ऑफिस मध्ये सल्लागार बैठकीत ट्रम्प बोलत होते तेव्हा त्यांनी आपले विचार बोलून दाखविले होते. मार्च मध्ये ही बैठक झाली तेव्हा ट्रम्प म्हणाले, या पोलादी भिंतीमध्ये विजेचा करंट हवा तसेच भिंतीवर काटेरी तारांचे जाळे हवे शिवाय आपल्या बाजूला एक रुंद खंदक खणून त्यात पाणी भरले जावे आणि त्यात साप मगरी असे प्राणी सोडले जावेत.

ही पोलादी भिंत बांधण्याचे काम वेगाने सुरु आहे. त्याचे २२ किमी काम झाले असून अन्य तीन देशानीही या भिंतीवर रिसर्च केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. ते म्हणाले ही पोलादी भिंत उन्हात इतकी तापते की त्यावर अंडे फ्राई करता येईल. भिंतीत भुयार खणता येऊ नये यासाठी जमिनीत खोलवर कॉंक्रीटचे काम केले गेले आहे. १९५४ मैल म्हणजे ३६०० किमी लांबीच्या या भिंतीसाठी ८ अब्ज ते ६७ अब्ज खर्च येणार आहे.

Leave a Comment