5 मिनिटात गायब होणार मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप आणणार नवीन फिचर

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर आणत आहे. काही दिवसांपुर्वीच  व्हॉट्सअ‍ॅपने स्टेट्सला फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करण्याचे फिचर आणले होते. आता व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी आणखी एक खास फिचर लाँच करणार आहे. रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅप सध्या एका फिचरवर काम करत असून, जे स्नॅपचॅटप्रमाणेच मिळते जुळते आहे. कंपनीने या फिचरला Disappearing Messages असे नाव दिले आहे.

हे फिचर लवकरच रोलआउट करण्यात येणार असून, सर्वात प्रथम व्हॉट्सअ‍ॅप बिटा युजर्ससाठी हे फिचर लाँच करण्यात येणार आहे. हे फिचर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे मेसेज गायब होतील.

रिपोर्टनुसार, Disappearing Messages फिचरमध्ये युजर्स आपल्या मेसेज एक्सपायर होण्यासाठी टाइम सेट करू शकतील. हा टाइम 5 सेंकद ते 1 तास एवढा असेल. सेट केलेल्या टाइमानंतर तुमचे मेसेज गायब होतील. हे फिचर सर्व तुमच्या सर्व मेसेजवर लागू होईल.

तसेच या फिचरचा उपयोग केल्यानंतर गायब झालेले मेसेज पुन्हा परत मिळणार नाहीत. काही युजर्सला हे फिचर आवडण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे ग्रुप चॅटमध्ये मेसेज ट्रेस करता येणार नाही. या फिचरद्वारे व्हॉट्सअ‍ॅप सिक्युरिटी अधिक मजबूत करत आहे. लवकरच हे फिचर आयओएस प्लॅटफॉर्मवर लागू होईल.

Leave a Comment