हा आहे विराटचा सर्वात मोठा फॅन, बघताच विराटने घेतली गळाभेट

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण अफ्रिकेविरूध्द होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी विशाखापट्टनम येथे प्रेस कॉन्फ्रेंसला संबोधित केले. प्री-मॅच प्रेस कॉन्फ्रेंसनंतर कर्णधार विराट कोहली प्रेस रूममधून बाहेर पडल्यावर जे बघायला मिळाले ते नक्कीच हैराण करणारे होते.

खेळाडू, अभिनेता आणि नेत्यांचे अनेक चाहते असतात. ज्याप्रमाणे सुधीर गौतम सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा फॅन आहे. राम बाबू महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे. असाच एक मोठा फॅन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मिळाला आहे.

(Source)

प्रेस कॉन्फ्रेंसमधून बाहेर आल्यावर विराट आपल्या सर्वात मोठ्या फॅन्सला बघून स्वतःला रोखू शकला नाही व त्याने त्या फॅनची गळाभेट घेतली. हा विराटचा सर्वात मोठा फॅन आहे कारण, त्याने संपुर्ण शरीरावर विराट संबंधीत गोष्टीचे टॅटू काढले आहेत.

(Source)

विराटचे प्रत्येक रेकॉर्ड आणि कामगिरी त्याने आपल्या शरीरावर गोंदवली आहे. बीसीसीआयचा लोगो देखील त्याच्या शरीरावर आहे. विराटच्या जर्सीचा क्रमांक 18 देखील त्याच्या शरीरावर आहे. याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकलेला अंडर 19 वर्ल्डकप, विराटला 2013 साली मिळालेला अर्जुन पुरस्कार, 2017ला मिळालेला पद्म श्री पुरस्कार देखील त्याच्या शरीरावर गोंदवले आहेत.

Leave a Comment