ही महिला दररोज का घालते तिच्या लग्नाचा पोशाख ?


ऑस्ट्रेलियाः दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड शहरातील एक महिला दररोज तिच्या लग्नाचा ड्रेस परिधान करते. ती फिशिंगला गेली की फुटबॉल किंवा जिम खेळली तरी ती सर्व कामे करत असतानाच तिचा लग्नाचा ड्रेस परिधान करते. टॅमी हॉल असे नाव असून ती पर्यावरणवादी आहेत. दररोज तिचा लग्नाचा ड्रेस परिधान करण्यामागचे कारण सांगताना टॅमी म्हणाली की त्याचा संबंध भारताशी आहे.

टॅमीने सांगितले की 2016 मध्ये ती भारत फिरायला गेली होती. तेथे नवीन कपडे आणि शूजवर किती खर्च करावा लागतो हे तिला कळले. भारतातून परत आल्यानंतर तिने मनात विचार केला की आता ती फालतू खर्च करणार नाही.

पण तिचे लग्न ऑक्टोबर 2018 मध्ये निश्चित झाले होते. लग्नाच्या वेळी, टॅमीला लेसी पांढऱ्या पोशाखसाठी 985 पौंड म्हणजेच सुमारे 86 हजार भारतीय रुपये खर्च करावे लागले. द सनच्या वृत्तानुसार, टॅमीने सांगितले की, फक्त एका ड्रेससाठी इतका खर्च करणे योग्य नाही. म्हणून, या ड्रेसचे पुर्ण पैसे वसुल करायचे आणि दररोजच्या कपड्यांप्रमाणे तो दररोज घालायचा आहे, असा निर्णय घेतला.

टॅमी म्हणाली, ‘जेव्हा मी दररोज हा लेसी ड्रेस घालते तेव्हा लोक मला बघतात. ते असा विचार करत असतील की अशा ड्रेसशिवाय, दुसरा कोणता ड्रेस घालता येऊ शकतो. परंतु मला दररोज माझा लग्नाचा पोशाख घालायला आवडेल. तर आता सार्वजनिक वाहतुकीत, लाकूड कापणे, कोणत्याही चिखलाचे काम किंवा बागकाम करताना प्रत्येक कामासाठी तिच्या लग्नाचा ड्रेस परिधान करते. पुढच्या सुट्टीमध्ये ती आपल्या पतीसमवेत हाच ड्रेस घालणार आहे.

Leave a Comment