टी-20 क्रिकेटमध्ये हे पाच फलंदाज झळकवू शकतात द्विशतक


अनेक खेळाडूंनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक मारण्याची कामगिरी केली आहे. पण असा पराक्रम टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही. दरम्यान टी-20मध्ये काही असेही स्पेशालिस्ट आहेत जे 20 ओव्हरमध्ये ही कामगिरी करू शकतात.

यात वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज आणि युनिवर्सल बॉसचे नाव आघाडीवर आहे. आयपीएलमध्ये गेलने सर्वात जास्त 175 धावा केल्या होत्या. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याने दोन शतक लगावण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे टी-20मध्ये गेल नक्कीच दुहेरी शतक लगावू शकतो.

यानंतर न्यूझीलंडचा स्टार ओपनर कॉलिन मुनरोचा क्रमांक लागतो. मुनरोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत तीन शतक लगावले आहे. त्याची पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांची शाळा घेणारा फलंदाज म्हणून ओळख आहे.

या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंचही सामिल आहे. त्याने झिम्बाम्वे विरोधात झालेल्या सामन्यात 172 धावांची तर इंग्लंड विरोधात 156 धावांची तुफानी खेळी केली होती. त्यामुळे फिंचचा टी-20मध्ये अशी अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश आहे.

या यादीत इंग्लंडचा जॉस बटलरही आघाडीवर आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बटलरने आक्रमक कामगिरी केली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सलामीला येणारा बटलर द्विशतकासाठी आघाडीवर आहे.

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माचे नावही या यादीत आघाडीवर आहे. रोहितने टी-20मध्ये तीन शतक लगावले आहेत. त्याचबरोबर रोहितने एकदा नाही तर दोनदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक लगावण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे तो टी-20मध्येही अशी कमाल करू शकतो.

Leave a Comment