टीम इंडियातील खेळाडूंसोबतच त्यांच्या पत्नीही करतात कोट्यवधींची कमाई!


टीम इंडियातील स्टार खेळाडूंच्या कमाईबाबत आपल्यामध्ये नेहमीच चर्चा होत असते. कमाईमध्ये विराट, धोनी आणि रोहित शर्मा हे तीन फलंदाज सर्वात आघाडीवर आहेत. पण कमाईमध्ये या क्रिकेटपटूंच्या पत्नीही काही कमी नाही आहेत.

बऱ्याच काळाच्या अफेअरनंतर 2017मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाहबंधनात अडकला. दरम्यान विराट कोहली सर्वात जास्त कमाई करणारा कर्णधार आहे. असे असले तरी, अनुष्का शर्मा कमाईमध्ये मागे नाही. यासंदर्भात topplanetinfo.com या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार 1 कोटी 5 लाख रूपये अनुष्का शर्माची नेट वर्थ आहे. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट अनुष्काने दिले आहे. अनुष्का आपल्या एका चित्रपटासाठी 12 ते 13 कोटी रुपये आकारते.

4 जुलै 2010मध्ये महेंद्र सिंह धोनीने साक्षीसोबत विवाह केला. साक्षी सामान्य घरातील असली तरी साक्षीची नेट वर्थ लग्नानंतर वाढली आहे. या संदर्भात biographywikipedia.com या संकेतस्थळा रिपोर्टनुसार साक्षीची नेट वर्थ 4 कोटी 1 लाख आहे. सध्या रिती स्पोर्ट्स या कंपनीची साक्षी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

हिटमॅन या नावाने रोहित शर्मा प्रसिध्द आहे. कारण त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. तर, त्याला चिअर करण्यासाठी त्याची पत्नी रितीका नेहमीच मैदानात हजर असते.

आजही क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची चर्चा होत असते. त्याच्याबरोबर अंजलीचेही कौतुक केले जाते. अंजली डॉक्टर असून नेहमीच सचिनसोबत दिसून येत असते. यासंदर्भात celebstrendnow.com दिलेल्या माहितीनुसार अंजलीची नेट वर्थ 1 कोटी आहे.

क्रिकेटपासून जरी सुरेश रैना लांब असला तरी, सोशल मीडियावर त्याची पत्नी अॅक्टिव्ह असते. इतर भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नींप्रमाणे सुरेश रैनाची पत्नी प्रियंका चौधरी त्याला चिअर करण्यासाठी मैदानात असते. यासंदर्भात celebstrendnow.comच्या रिपोर्टनुसार प्रियांकाची नेट वर्थ आहे 1 कोटी.

Leave a Comment