17 वर्षांपासून फरार कैद्याला पोलिसांनी पकडले ड्रोनच्या मदतीने

चीनच्या योंगशान पोलिसांनी मागील 17 वर्षांपासून फरार असलेल्या एका कैद्याला ड्रोनच्या मदतीने पकडले आहे. मागील महिन्यात पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे माहिती मिळाली की, 63 वर्षीय फरार कैदी सोंग जियांग युन्नानच्या जंगलात लपला आहे. पोलिसांनी या माहितीद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी ड्रोनची मदत घेत या कैद्याला पकडले.

(Source)

हा कैद्यी जंगलातील एका गुहेत लपून राहत होता. तो कोणाच्याच संपर्कात नव्हता. पोलिसांनी सोंगने गेली अनेक दिवसांपासून आंघोळ देखील केली नव्हती. 17 वर्षांमध्ये त्याचा चेहरा देखील बदलला आहे. त्यामुळे त्याला ओळखण्यात देखील अडचणी आल्या.

(Source)

सोंगला महिला आणि लहान मुलांच्या तस्करीसाठी शिक्षा झाली होती. मात्र 2002 मध्ये तो जेलमधून फरार झाला होता. सोंगकडे प्लास्टिकची एक बाटली सापडली असून, त्याचा वापर तो पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी करत असे. पोलिसांनी गुहेत सोंगची झोपण्याचे बेड आणि जळालेली लाकडे देखील सापडली.

 

Leave a Comment