रिकी मार्टिन आणि त्याचा नवरा चौथ्यांदा होणार बाबा

प्रसिध्द अमेरिकन गायक रिकी मार्टिन आणि पती ज्वान युसुफ चौथ्यांदा पॅरेंट्स बनणार आहेत. एका शो दरम्यान रिकीने याबाबतची माहिती दिली. रिकीने सांगितले की, आम्ही प्रेग्नेंट आहोत. मला मोठे कुटुंब आवडते.

या वर्षाच्या सुरूवातीलाच दोघांनी एका मुलीला जन्म दिला होता. दोघांचेही हे चौथे बाळ असेल. याआधी दोघांना 8 महिन्यांची मुलगी आणि 10 वर्षांचा जुळ्या मुलाचा सांभाळ करत आहेत. त्यांचे नाव मोटेओ आणि वैलेंटिनो आहे.

रिकी मार्टिन समलैंगिक असून, त्याचे युसुफबरोबर दोन वर्षांपासून अफेयर सुरू आहे. 47 वर्षीय मार्टिनने 2016 मध्ये युसुफला डेट करण्यास सुरूवात केले होते. एक वर्षापुर्वीच या दोघांनी लग्न केले आहे.

View this post on Instagram

La luz de mis ojos #Lucia

A post shared by Ricky (@ricky_martin) on

रिकी मार्टिन आंतरराष्ट्रीय गायक असून, दोन वेळा ग्रॅमी विजेता देखील आहे. तो लॅटिन अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.

 

Leave a Comment