भाजपच्या तिकीटावर कणकवलीतून निवडणूक लढवणार नितेश राणे


कणकवली : नितेश राणे भाजपकडून कणकवली विधानसभेच्या जागेवर लढणार हे स्पष्ट झाले असून भाजप त्यांना पक्षप्रवेशाचा कार्यक्रम न करताच एबी फॉर्म देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नारायण राणे यांनी काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यानंतर नितेश राणे यांनी काही वेळातच आपल्या ट्विटरवरून ‘काही तास बाकी’ असे ट्विट केले.

दरम्यान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचे घोड अजून अडलेलेच आहे. हा कार्यक्रम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पुढे ढकलला जात आहे. शिवसेनेचा राणेंच्या भाजप प्रवेशाला जोरदार विरोध असल्यामुळे राणेंसमोर आव्हान उभे राहीले आहे. आपण २ ऑक्टोबरला भाजप प्रवेश करु असे राणेंनी नुकतेच जाहीर केले होते. पण आजही तशी शक्यता दिसत नाही. मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास अर्धा तास राणेंनी चर्चा केली. भाजपमधील लांबलेल्या प्रवेशाबाबत ही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेत नेमके काय झालं यातून राणे परिवाप राणेंनंतर संजीव नाईक, गणेश नाईक यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

सध्या आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नितेश राणे हे व्यक्त होताना दिसत आहेत. लोक जेव्हा तुमच्याबद्दल वाईट बोलतील तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे केले आहे’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. त्यानंतर पुन्हा एक ट्विट त्यांनी केले आहे. यामध्ये काही तास बाकी ( वादळापुर्वीची शांतता) असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजपचा एबी फॉर्म नितेश राणे यांना मिळणार आहे. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम न करताच भाजपकडून नितेश राणे यांना थेट एबी फॉर्म देण्यात येणार आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली. मात्र कणकवलीतून निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवण्यासाठी मुख्यमंत्री यांचा ग्रीन सिग्नल त्यांना मिळाला आहे. दरम्यान नारायण राणे यांचा प्रवेश मात्र अजूनही लांबणीवरच दिसत आहे. केवळ एक जागा राणेंना मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Comment