मुंबईच्या ‘या’ स्थानकांचा देशातील टॉप 3 स्वच्छ स्थानकांमध्ये समावेश


नवी दिल्ली : मुंबईच्या उपनगरातील तीन स्थानकं सर्वाधिक स्वच्छ असल्याचे देशपातळीवरील स्वच्छ रेल्वे स्थानक सर्वेक्षणात समोर आले आहे. मुंबईतील अंधेरी, विरार आणि नायगाव स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. या तीन स्थानकांची निवड एकूण 109 उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या सर्वेक्षणातून करण्यात आली आहे.

हा उपक्रम रेल्वेकडून स्वच्छ भारत अभियान प्रत्येक रेल्वे स्थानकावर राबवला जातो. आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितित गांधी जयंतीच्या निमित्ताने देशातील सर्वाधिक स्वच्छ असलेल्या स्थानकांची घोषणा करण्यात आली. राजस्थानच्या तीन स्थानकांची यामध्ये निवड करण्यात आली असून उपनगरीय रेल्वेमध्ये मुंबईच्या तीन स्थानकांनी अव्वल तीनमध्ये निवड केली आहे.


2016 पासून देशातील सर्व स्थानकांचे ऑडिट आणि स्वच्छता रँकिंग रेल्वेकडून करण्यात येते. एका खासगी संस्थेद्वारे हे ऑडिट करण्यात येते. 407 स्थानकांचा सर्वे गेल्यावर्षी करण्यात आला होता. यावर्षी एकूण 720 स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि पहिल्यांदाच उपनगरीय रेल्वे स्टेशनचाही यामध्ये सहभाग होता.

हा सर्वे दरवर्षी करण्यात येतो. मात्र यंदा पहिल्यांदाचा या सर्वेमध्ये उपनगरीय रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. रेल्वेचे एकूण तीन भाग आहेत. ज्यामध्ये उत्तर पश्चिम रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य आणि पूर्व मध्य रेल्वे असे तीन क्षेत्रात रेल्वेचे विभाजन केलेले आहे.

Leave a Comment