‘सरकारच्या विरोधात एकजुट व्हा’, मार्क झुकरबर्गची ऑडिओ क्लिप लीक

जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गची एक ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. या क्लिपमध्ये ते आपल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करत आहेत. लीक झालेली ऑडिओ क्लिप ही दोन तासांची असून, याबाबतचे वृत्त टेक वेबसाइट द वर्जने दिले आहे.

द वर्जच्या रिपोर्टनुसार, लीक झालेली ऑडिओ क्लिप ही मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मिटिंगबद्दलची आहे. या मिटिंगमध्ये मार्क झुकरबर्ग आपल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेच्या सरकारविरोधात एकजूट होण्यास सांगत आहेत.

ऑडिओमध्ये मार्क झुकरबर्ग मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरची देखील खिल्ली उडवत आहे. ते म्हणाले की, जेवढा ट्विटरचा रेवेन्यू आहे, तेवढा खर्च तर फेसबुक सिक्योरिटीवर करतो. याचबरोबर ते म्हणाले की, जगातील प्रत्येक देशात ते सुनावणीसाठी जाऊ शकत नाही. क्रेंबिज अनालिटिका डाटा लीक प्रकरणात झुकरबर्गला युरोपियन युनियनमध्ये सुनावणीसाठी जावे लागले होते.

द वर्जच्या रिपोर्टनुसार, मार्क झुकरबर्गने अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवार एलिजबेथ वॉरेनबद्दल देखील वक्तव्य केले आहे. मार्क म्हणाले की, वॉरेन हे सर्व कंपन्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच मार्क ऑडिओमध्ये म्हणाले आहेत की, ते आपल्या सरकारशी कोणतीही लढाई लढू इच्छित नाही. मात्र त्यांना जर अशी धमकी मिळाली तर ते कायदेशीर लढाई नक्की लढतील.

माझापेपर या ऑडिओच्या सत्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.

 

Leave a Comment