महिंद्राकडे असेल फोर्डच्या भारतीय व्यवसायावर संपुर्ण नियंत्रण

देशातील दिग्गज वाहन निर्माती कंपनी महिंद्रा अँन्ड महिंद्रा  आणि अमेरिकन कंपनी फोर्ड मोटार यांच्यामध्ये करार झाला असून, या अंतर्गत दोन्ही कंपन्या 1289 कोटींची संयुक्त भागीदारी कंपनी (जेवी) तयार करतील. यामध्ये महिंद्रा कंपनी भागीदारी 51 टक्के असून, कंपनी 657 कोटींची गुंतवणूक करेल. 49 टक्के हिस्सा हा फोर्डचा असेल.

या कराराअंतर्गत फोर्डच्या भारतातील ओटोमोबाईल बिझनेसवर महिंद्राचे नियत्रंण असेल. या करारांतर्गत महिंद्रा भारतात फोर्डच्या वाहनांची निर्मिती व विक्री करेल. याशिवाय फोर्ड मोटारचा भारतातील बाजार वाढावा यासाठी 1400 कोटींची गुंतवणूक देखील करण्यात येईल, असे महिंद्राकडून सांगण्यात आले आहे.

फोर्ड इंडिया कंपनी भारतात 1995 पासून काम करत आहे. या कंपनीचे चेन्नई आणि साणंद येथे दोन कारखाने आहेत. मागील काही काळापासून फोर्डचा भारतीय बाजारातील व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळेच फोर्डने संयुक्त कंपनीचा निर्णय घेतला आहे.

 

Leave a Comment