लग्नाआधीच गरोदर आहे कल्की


बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी लग्नाआधी गरोदर राहण्याचा ट्रेण्ड काही नवीन नाही. आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री कल्की केकला गरोदर प्रेग्नंट आहे. कल्की बॉयफ्रेण्ड गाय हर्षबर्गपासून गर्भवती असल्याची माहिती आहे.


एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कल्कीने आपण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे जाहीर केले. कल्कीने आपण गाय हर्षबर्गसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे सोशल मीडियावर फोटो शेअर करुन ऑफिशिअली सांगितले होते. 35 वर्षीय कल्कीने आपण आई होणार असल्याची गुड न्यूज शेअर करतानाच शारीरिक बदल अनुभवत असल्याचेही सांगितले. आपण मातृत्वसुखाच्या चाहूलीने शहारल्याचे कल्की सांगते.


कल्की आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी 2011 मध्ये लगीनगाठ बांधली होती. 2013 मध्ये दोघं परस्पर संमतीने विभक्त झाले, तर 2015 मध्ये कल्की आणि अनुराग यांना घटस्फोट मंजूर झाला. घटस्फोटानंतरही कल्की आणि अनुराग चांगले मित्र आहेत. दोघे बऱ्याच इव्हेंटमध्ये एकत्र फिरताना दिसतात. अनुरागसोबत विवाहबंधनात असताना कल्की आई होण्याच्या विरोधात होती. पण तिला काळाच्या ओघात कुटुंबाची गरज जाणवत आहे.

View this post on Instagram

It's always a Sunday when I'm with my favourite caveman🥰

A post shared by Kalki (@kalkikanmani) on


कल्कीने बाळाच्या जन्माचं प्लॅनिंगही केले आहे. वॉटर बर्थच्या माध्यमातून आपली प्रसुती व्हावी, अशी कल्कीची इच्छा आहे. या पद्धतीनुसार पाण्याखाली बाळाचा जन्म होतो. ही गर्भवतीसाठी कमी वेदनादायी पद्धत आहे. वर्षअखेरीस गोव्याला जाऊन डिलीव्हरी करण्याचा कल्कीचा मानस आहे. कल्की आणि हर्ष यांनी बाळाचे नावही निश्चित केले आहे. मुलगा असो वा मुलगी, दोघांनाही सूट होईल अशा नावाचा विचार दोघांनी केलेला आहे.

View this post on Instagram

Guy, girl and sushi mania

A post shared by Kalki (@kalkikanmani) on


मूळ फ्रेंच वंशीय असूनही कल्की बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरावली आहे. तिची 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देव.डी’ चित्रपटातील चंद्रमुखीची व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर द गर्ल इन येलो बूट्स, शैतान, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शांघाय, ये जवानी है दिवानी, मार्गारेटा विथ अ स्ट्रॉ, गली बॉय यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट तिने केले. याशिवाय सेक्रेड गेम्स 2, मेड इन हेवन या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती. काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री एमी जॅक्सन हिनेही मुलाला जन्म दिला. एमीचा बॉयफ्रेण्ड जॉर्ज पानायियोटोसोबत साखरपुडा झाला आहे. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

Leave a Comment