3200 कर्मचारी झाले देशातील पहिल्या ‘टॉयलेट कॉलेज’मधून उत्तीर्ण

देशातील पहिले टॉयलेट कॉलेज म्हणून ओळख असणाऱ्या ‘हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज’ने मागील एक वर्षात 3200 स्वच्छता कर्माचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. आता प्रशिक्षणानंतर त्यांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे असलेल्या या कॉलेजमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यकुशलता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कार्यासंबंधी असलेला धोक्याबद्दल जागृक करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. ऑगस्ट 2018 मध्ये स्थापन करण्यात आलेले हे कॉलेज ब्रिटिश कंपनी रेकिट बेनकाइजरद्वारे चालवले जाते.

कंपनीने सांगितले की, आतापर्यंत कॉलेजने 3200 स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे व त्यांना रोजगार मिळवून देण्यास मदत केली आहे. प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरील संघटना आणि कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे.

हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेजमध्ये 25-30 कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक बॅचला दररोज 3 तासांचे प्रशिक्षण दिले जाते. महिलांसाठी दुपारी 1 ते 4 आणि पुरूषांसाठी सायंकाळी 4 ते 7 वर्ग घेण्यात येतो.

Leave a Comment