तब्बल 15 वर्षांनंतर रिंगमध्ये परतणार ‘द रॉक’

सुपरस्टार ड्वेन जॉनसन म्हणजेच ‘द रॉक’ lतब्बल 15 वर्षांनतर रिंगमध्ये परतणार आहे. ड्वेनने ट्विट करत याबाबत माहिती दिली. ड्वेनने ट्विट केले की, अखेर डब्ल्यूडब्ल्यूईच्या जगात परत येत आहे.

ड्वेन फॉक्स स्पोर्टचा शो स्मॅक डाउनमध्ये शुक्रवारी दिसेल. ट्विटमध्ये त्याने आपल्या रेसलिंग करिअरमधील एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. रॉकने एक्टिंगकडे वळण्याआधी 8 वर्षांपुर्वी रेसलिंग केली होती.

डब्ल्यूडब्ल्यूई 4 ऑक्टोंबरला स्मॅक डाउनची 20 वी एनिवर्सरी सेलिब्रेट करणार आहे. रॉकबरोबर या 1000 व्या भागात हल्क होगन, रिक फ्लेयर, कर्ट एंग्ल, मिक फोले, गोल्डबर्ग, स्टिंग देखील दिसतील.

फॉर्ब्स मॅग्झिननुसार, ड्वेन जॉनसन हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे.

Leave a Comment