तुम्ही पाहिले आहे का ‘लाल कप्तान’चे नवे पोस्टर?


बॉलिवूडचा नवाब अर्थात अभिनेता सैफ अली खान हा बहुचर्चित ‘लाल कप्तान’ या चित्रपटात झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. चित्रपटाबद्दलची उत्कंठा ट्रेलरने वाढवली आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.


नागा साधूच्या भूमिकेत दिसणारा सैफ अली खान नव्या पोस्टरमध्ये हातात बंदुक घेतलेला दिसतो. बंदुकीच्या नळीवरुन घोडेस्वार क्रांतीकारक आक्रमक झालेले दिसतात. हे अनोखे पोस्टर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहे. नवदीप सिंह हे ‘लाल कप्तान’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय हे करत आहेत. हा चित्रपट १८ ऑक्टोंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment