विद्युतच्या ‘कमांडो ३’चा फर्स्ट लूक रिलीज


बॉलिवूडचे अॅक्शनपट असलेल्या कमांडो हा अतिशय वेगवान अॅक्शन आणि स्टंट्स असलेला चित्रपट होता. आता विद्युत जामवालच्या या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. नुकताच ‘कमांडो ३’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.


विद्युत जामवाल ‘कमांडो ३’ च्या या फर्स्ट लूकमध्ये दोन स्टेनगनसह शत्रूवर तुटून पडलेला दिसत आहे. या पोस्टरचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कमांडो चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांपेक्षा हा तिसरा भाग अधिक आकर्षक आणि भरपूर मनोरंजन करणारा असल्याचे निर्मात्याकडून सांगण्यात येते.

विद्युत जामवाल, अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन देवायह यांच्या ‘कमांडो ३’ चित्रपटात भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment