मनसेच्या पहिल्या यादीत धर्मा पाटलांच्या मुलाला उमेदवारी


मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आपल्या पहिल्या यादीत मनसेने 27 उमेदवारांची घोषणा केली. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना धुळ्यातील सिंदखेडा मतदारसंघातून उमेदवारी घोषित झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली. 5 ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. मनसेने सध्या आपल्या 27 उमेदवारांची नावे घोषित केली. तसेच, रोज पाच-सहा नावे जाहीर करेन, असे राज यांनी सांगितले आहे.

Leave a Comment