टिंडरवर दुसऱ्यांचे प्रोफाईल चेक करण्यामध्ये पुणेकर अव्वल

डेटिंग अ‍ॅप टिंडरने देशातील 6 राज्यातील युजर्सचा डेटा जारी केला आहे. या अ‍ॅपने राइट स्वाइप आणि सर्वाधिक एक्टिव असणाऱ्या युजर्सची यादी सादर केली असून, या लिस्टमध्ये पुण्यातील युजर्स सर्वाधिक प्रमाणात दुसऱ्यांचे प्रोफाइल चेक करतात. तसेच राइट स्वाइपमध्ये पुण्यानंतर दिल्ली-एनसीआर, चंदीगड, मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरूमधील युजर्स येतात. तर दुसरीकडे दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, पुणे, मुंबई, चंदीगढ आणि कोलकातामधील युजर्स सर्वाधिक टिंडरचा वापर करतात.

टिंडर अ‍ॅपची सुरूवात अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये झाली होती. या डेटिंग अ‍ॅपचा वापर 190 देशांमध्ये केला जातो. ऑगस्टमध्ये या अ‍ॅपला 58 लाख वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे.

रिपोर्टनुसार अन्य अ‍ॅप्सच्या तुलनेत टिंडर 2019 च्या पहिल्या सहामाहीत सर्वाधिक कमाई केली आहे. या अपने 500 कोटींची कमाई केली आहे. या अ‍ॅपने व्हिडीओ स्ट्रेमिंग अ‍ॅप नेटफ्लिक्सला देखील मागे सोडले आहे.

Leave a Comment