2 ऑक्टोंबरच्या निमित्ताने ट्विटरवर ‘दृष्यम’ चित्रपटाच्या मीम्सचा पाऊस

2 ऑक्टोंबर हा दिवस भारतासाठी विशेष आहे. या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली जाते. याच दिवशी पाच वर्षांपुर्वी केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत मिशनची देखील सुरूवात करण्यात आली होती. मात्र 2 ऑक्टोंबर हा दिवस आणखी एका गोष्टीसाठी लक्षात ठेवला जातो. तो म्हणजे ‘दृष्यम’ या चित्रपटासाठी.

दरवर्षी 2 ऑक्टोंबर आला की, युजर्सकडून दृष्यम चित्रपटावर मीम्स शेअर करण्यात येत असतात. जर तुम्ही 2015 साली आलेला दृष्यम चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला या मागचे कारण नक्कीच माहिती असेल.

मात्र ज्यांना माहिती नाही अशासांठी की, या चित्रपटात विजय साळगावकरची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगन आणि त्याचे कुटुंब एका गुन्ह्यातून वाचण्यासाठी या तारखेचा वापर करतात. वारंवार ही तारीख सांगून ते या चित्रपटाचा प्लॉटच बदलून टाकतात.

तेव्हापासून दरवर्षी 2 ऑक्टोंबरला युजर्स भन्नाट मीम्स शेअर करत असतात. असेच काही मजेशीर मीम्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

दिवस लक्षात आहे ना ?

 

Leave a Comment