फक्त पाच हजारांत बुक करा ‘रेनॉल्ट’ची नवी क्विड


नवी दिल्ली – रेनॉल्ट नुकतीच आपली लोकप्रिय छोटी कार क्विडचे फेसलिफ्ट मॉडल लाँच केले असून या कारच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 2.83 लाख रुपये(एक्स-शोरुम) एवढी तर टॉप व्हेरिअंटची किंमत 4.84 लाख रुपये(एक्स-शोरुम)एवढी आहे. पेट्रोल इंजिनचे दोन पर्याय आधीच्या कारप्रमाणेच यामध्येही आहेत. या कारसाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंग देखील सुरू झाली असून पाच हजार रुपयांमध्ये बुकिंगला सुरूवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच मारुती सुझुकीने लाँच केलेल्या मायक्रो एसयूव्ही S-Presso शी नव्या क्विडची टक्कर असणार आहे. 3.69 लाख रुपये (एक्स-शोरुम) एवढीS-Presso च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत, तर टॉप व्हेरिअंटची किंमत 4.91 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.

चीनमध्ये विक्री होणाऱ्या क्विडच्या (City K-ZE)इलेक्ट्रिक व्हर्जनच्या प्रेरणेतून अपडेटेड क्विडचे डिझाइन घेण्यात आले आहे. एमजी हेक्टर आणि टाटा हॅरियर एसयूव्हीप्रमाणे यामध्ये स्प्लिट हेडलँप सेटअप आहे. याशिवाय फ्रंट ग्रिलच्या डिझाइनमध्ये बदल करुन सोबत LED DRL चा वापर करण्यात आला आहे. मुख्य हेडलँपची जागा थोडी खाली घेऊन फ्रंट बंपरवर असेल. नवीन अॅलॉय व्हिल्स आणि टेल लँप्स एलईडी लाइटसह असतील. याच्या बंपरला नवे डिझाइन दिल्यामुळे स्पोर्टी लूक आला आहे. हनीकॉम्ब पॅटर्न ग्रिल जुन्या मॉडलमध्ये होते, तर नव्या क्विडमध्ये ट्रिपल स्लेट्स ग्रिल आहे. कारच्या मागील लूकमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. यामध्ये रिअर बंपर, नवे लाइट रिफ्लेक्टर्स आणि टेल लाइटमध्ये नवीन एलईडी एलिमेंट्स आहेत. याशिवाय, कारच्या टॉप व्हेरिअंटमध्ये पुढील आणि मागील बाजूला फॉक्स स्किड प्लेट्स, रूफ रेल्स, गनमेट ग्रे अॅलॉय व्हिल्स आणि ऑरेंज हायलाइट्स आहेत.

थोडाफार बदल नवीन क्विडच्या डॅशबोर्डच्या डिझाइनमध्ये केला आहे. ८-इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आणि नवीन स्टिअरिंग व्हिल यामध्ये आहे. नुकत्याच लाँच झालेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही ट्रायबरमधील इंफोटेनमेंट सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. ट्रायबरमधीलच नवीन इंस्ट्रुमेंट क्लस्टर देखील यामध्ये असून टेकोमीटरचाही समावेश आहे. फीचर्स-फेसलिफ्ट क्विडच्या टॉप मॉडलमध्ये अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, 14-इंच अॅलॉय व्हिल्स, एलईडी डीआरएल, मॅन्युअल एसी आणि रियर सेंटर आर्मरेस्ट यांसारखे फीचर्स आहेत. ड्रायव्हर साइड एअरबॅग, ईबीडी, एबीएस, सीटबेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टिम आणि रिव्हर्स पार्किंग सेंसर्स हे फीचर्स कारच्या सर्व व्हेरिअंटमध्ये आहेत. टॉप व्हेरिअंटमध्ये फ्रंट पॅसेंजर साइड एअरबॅग आहे. इंजिन -नव्या क्विडमध्ये मॅकेनिकली बदल करण्यात आलेला नाही. जुन्या मॉडलप्रमाणे यामध्येही 0.8-लीटर आणि 1.0-लिटर पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. हे इंजिन 54hP आणि 1.0-लिटर इंजिन 68hp क्षमतेचं आहे. छोट्या इंजिनसह केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. तर, 1.0-लिटर इंजिनसह मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय देखील आहे.

Leave a Comment