बबिता ताडे झाल्या निवडणूक आयोगाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर


अमरावती: नुकताच ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमधून 1 कोटी रुपये जिंकणारी बबिता ताडे यांची निवडणूक आयोगाने जिल्हा दूत म्हणून नियुक्ती केली आहे. होय, बबिता ताडे यांना अमरावती जिल्ह्यातून त्यांच्या एसव्हीईईपी (सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) प्रोग्रामसाठी जिल्हा राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले की, आता बबिता ताडे अमरावती जिल्ह्याचे जिल्हादूत म्हणून लोकांकडे जातील आणि मतदानाचे महत्त्व सांगतील. याचवेळी बबिता ताडे म्हणाल्या, ‘मी लोकांशी, विशेषत: गावातील लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन. मी त्यांना मोठ्या संख्येने मतदानात सहभागी होण्यास उद्युक्त करेन.

एसव्हीईईपी म्हणजे काय?
मतदार नियोजित जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम निवडणूक आयोगाचा प्रमुख कार्यक्रम आहे, ज्याचा हेतू लोकांना मतदानाबद्दल जागरूक करणे आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग 2009 पासून एसव्हीईईपी (सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन) कार्यक्रम चालवित आहे.

कोण आहेत बबिता ताडे
बबिता ताडे महाराष्ट्रातील अमरावती येथील आहेत. त्या मुलांसाठी मिड-डे जेवण करुन आपले घर चालवतात, ज्यातून तिला महिन्यातून 1500 रुपये मिळतात. बबिता ताडे यांना शाळकरी मुले ‘खिचडी काकू’ म्हणतात. बबिता सुमारे 450 शालेय मुलांसाठी दररोज खिचडी बनवतात आणि तिलाही तिच्या कामावर प्रेम आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ च्या सेटवर स्वत: अमिताभ बच्चन यांनीही बबिता ताडे यांचे कौतुक केले होते.

Leave a Comment