महात्मा गांधींना एअर इंडियाची अनोखी आदरांजली


मुंबई – एअर इंडियाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने त्यांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधी यांचे रेखाचित्र एअर इंडियाच्या ताफ्यातील एअरबस ३२० विमानावर रेखाटण्यात आले आहे.

११ बाय ४.९ फुटाचे महात्मा गांधींचे रेखाचित्र विमानाच्या मागील बाजूस रेखाटण्यात आले आहे. हे चित्र दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या हँगरमध्ये चित्रकाराने रेखाटले. आता हे विमान मुंबई ते दिल्ली या दोन्ही महानगरांतील प्रवासासाठी वापरण्यात येणार आहे.

एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार म्हणाले, एअर इंडियाच्या महात्मा गांधी यांचे चित्र ताफ्यातील एका विमानावर कायमस्वरुपी रेखाटून आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. आम्ही वेगळ्या पद्धतीने महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. सर्व प्रकारच्या मान्यता घेतल्यानंतर आमच्याकडील एका चित्रकाराने हे चित्र रेखाटल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment