अलिबाग मतदार संघातून तब्बल 5 ‘सुभाष पाटील’ निवडणुकीच्या रिंगणात


मुंबई – प्रत्येक निवडणूकीला देशभरामध्ये एकाच नावाच्या दोन व्यक्ती दोन वेगवेगळ्या मतदार संघातून लढताना आपण पाहिल्या आहेत. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदार संघातून चक्क एका नावाच्या पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. PWP चे विद्यमान आमदार सुभाष पाटील यांनी अलिबागमधून काल आपला अर्ज भरला आहे. आता अलिबागमधूनच सुभाष लक्ष्मण पाटील, सुभाष जर्नादन पाटील, सुभाष गंगाराम पाटील आणि सुभाष दामोदर पाटील अशा चौघा अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत.

हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना अशा प्रकारे सारख्या नावांचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवणे हा प्रकार गलिच्छ निवडणूकीचा एक प्रकार असल्याचे सुभाष प्रभाकर पाटील यांनी म्हटले आहे. पण याकडे मी फारसे लक्ष देत नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हा प्रकार मला हरवण्यासाठी विरोधकांचा राजकीय डाव असल्याचे सध्याचे विद्यमान आमदार सुभाष पाटील यांनी म्हटले आहे. यासाठी कोणत्याच विशिष्ट पक्षाला, व्यक्तीला माझा विरोध नाही. मला निवडणूकीत हरवण्याचा प्रयत्न केला तरीही माझ्या मतदारांना माझे नाव, निवडणूक चिन्ह माहित आहे. ते मी पुन्हा मतदारांना प्रचाराच्या वेळेस सांगेन.

शिवसेना-भाजप युतीने अद्याप अलिबाग विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. पण PWP हा पक्ष कॉंग्रेस-एनसीपी सोबत जाणार आहे. लोकसभा निवडणूकीदरम्यानही सुनील तटकरे यांना देखील सारख्याच नावाच्या दोन अपक्ष उमेदवारांचे आव्हान होते.

Leave a Comment