या विचित्र कारणामुळे 24 वर्षीय युवकाने 81 वर्षांच्या आजीबरोबर केला विवाह

युक्रेनमध्ये एका 24 वर्षीय युवकाने 81 वर्षांच्या वृध्द महिलेशी विवाह केला आहे. अ‍ॅलेक्झांडर कोंड्रट्यूक नावाच्या युवकाने नात्यामध्ये आजी लागणाऱ्या 81 वर्षीय वृध्द महिलेशी विवाह केला.

हे लग्न या युवकाने सैन्यामध्ये भरती होण्यापासून वाचण्यासाठी केले. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, त्या युवकावर टीका केली जात आहे.

(Source)

युक्रेनमध्ये 18 ते 26 वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला सैन्यात कर्तव्य बजवाणे अनिवार्य आहे. विन्नित्सा शहरात राहणाऱ्या अ‍ॅलेक्झांडरला देखील सैन्याकडून याबाबत पत्र आले. युक्रेनमध्ये प्रत्येक युवकाला सैन्यात एक वर्ष कार्य करावे लागते. मात्र अ‍ॅलेक्झांडरला सैन्यात काम करायचे नव्हते. त्यामुळे त्याने नियमांचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला.

नियमांनुसार मिलिट्री सर्विसमधून अशाच लोकांना सुट्टी मिळते, ज्यांच्यावर एखाद्या दिव्यांगाला सांभाळण्याची जबाबदारी असते. अ‍ॅलेक्झांडरने याच नियमाचा फायदा घेत चुलत बहिणीची आजी जिनायडाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता सर्वजण म्हणत आहेत की, 26 वर्षांचा झाल्यानंतर अ‍ॅलेक्झांडरला जिनायडाला घटस्फोट देईल.

(Source)

2018 ला पहिल्यांदा हे प्रकरण समोर आले होते. त्यावेळी मिलिट्री कमिश्नर ऑफिसने न्यायालयात हे लग्न रद्द करण्यात यावे यासाठी याचिका दाखल केली होती. सैन्यानुसार अ‍ॅलेक्झांडरनी जी कागदपत्र दाखवली ती खोटी आहेत. मात्र चौकशीत या दांपत्याने शेजारील गावातच लग्न केल्याचे समोर आले.

सप्टेंबरमध्ये सिविल अॅक्ट रजिस्ट्रेशन ऑफिसने हे लग्न कायदेशीर असल्याचे म्हटले, त्यामुळे सैन्याला माघार घ्यावी लागली.

(Source)

81 वर्षीय जिनायडा यांच्यानुसार, अ‍ॅलेक्झांडर त्यांची खूप काळजी घेतो. तर अ‍ॅलेक्झांडरने सांगितले की, सैन्यात भरती होण्यापासून वाचण्यासाठी नाही तर तो खरचं जिनायडा यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांची देखभाल करता यावी यासाठी लग्न केले आहे.

युक्रेनी कमिश्नर ऑफिसनुसार, आता ते हे प्रकरण वाढवणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणात अ‍ॅलेक्झांडरचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment