मोदींनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना वाहिली आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जात महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. तसेच, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने मोदींनी त्यांनाही आदरांजली वाहिली.

गांधी जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी दिल्ली आणि गुजरातमधील अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

याचबरोबर युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देखील राजघाटावर जात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान मोदींनी गांधीजींच्या जंयतीनिमित्ताने ट्विट करत त्यांना शत शत नमन केले.

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने मोदींनी ट्विट केले की, “जय जवान, जय किसान घोषणा देत देशभरात नवउर्जेचा संचार करणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना शत-शत नमन.”

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील ट्विट करत महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांना आदरांजली वाहिली.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी देखील महात्मा गांधींना ट्विट करत आदरांजली वाहिली.

 

Leave a Comment