शाहरुखचा हुबहू इंटरनेटवर खातोय भाव


बॉलीवूड कलाकारांचे हुबहू नेहमीच इंटरनेटवर भाव खाऊन जातात. अनुष्का सारखी दिसणारी ज्युलिया मायकल असो की कॅटरिनासारखी दिसणारी एलिना राय असो, त्यांच्या या एकाच गुणावर त्यांना सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळते. अक्षयकुमारचा एक हुबहू नुकताच चर्चेत आला होता आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या हमशकलचे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. अर्थात किंग खान सारखे दिसावे यासाठी अनेकजण त्याच्यासारखे कपडे, हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न करत असले तरी खरा किंग खान एकच आहे.


या हुबहूचे नाव आहे अक्रम अल इस्सावी. तो जॉर्डनमध्ये राहतो आणि व्यवसायाने फोटोग्राफर आहे. अर्थात चर्चेत येण्याची ही त्याची पहिली वेळ नाही यापूर्वीही तो अनेकदा चर्चेत आला आहे. २०१८ मध्ये त्याने अल अरेबिया वाहिनीला मुलाखत दिली होती. स्थानिक लोक त्याला शाहरुख म्हणून हाक मारतात आणि त्याच्यासोबत सेल्फी घेतात. सोशल मीडियावर या डुप्लीकेट शाहरुखची चर्चा जोरात असली तरी किंगखानने त्यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या शाहरुख कॅमेऱ्यापासून थोडा दूर आहे. त्याने अनेक चित्रपट स्वीकारल्याची चर्चा असली तरी शाहरुखने त्याचा इन्कार केला आहे.

शाहरुखने सध्या वेबसिरीज निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. नेटफ्लिक्सच्या ओरीजीनल सिरीज बार्ड ऑफ ब्लडचा निर्माता किंग खान हाच आहे.

Leave a Comment