म्हणून गांघीजींनी सही देण्यासाठी घेतले होते ५-५ रुपये


राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस आज देशभर गांधी जयंती म्हणून साजरा केला जात आहे. महात्माजींच्या आयुष्यातील अनेक घटना खास स्मरणीय आहेत. आयुष्यभर सत्य, अहिंसा आणि दया ही तत्वे उराशी बाळगून जगलेल्या गांधीजीनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना एकत्र केले होते आणि शांततापूर्ण मार्गाने ही लढाई लढली होती. कारण सद्भावना, प्रेम आणि चर्चेतून कोणताही प्रश्न सोडविता येतो यावर त्यांची नितांत श्रद्धा होती..

याच आपल्या बापुजींनी त्यांचा ऑटोग्राफ घेऊन इच्छिणाऱ्या लोकांकडून एकेकाळी ५ -५ रुपये घेऊन मगच ऑटोग्राफ दिले होते असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नही. पण ही घटना घडली होती १९३४ मध्ये. तेव्हा बिहारच्या भागलपूर भागाला भूकंपाचा मोठा फटका बसला होता. भूकंप पिडीतांसाठी तत्कालीन कॉंग्रेसने मदतकार्य सुरु केले होते. हे कार्य कसे चालू आहे हे पाहण्यासाठी गांधीजी एप्रिल मे मध्ये सहरसा, बिहरपूर ते भागलपूर असा प्रवास करून पोहोचले होते.

भागलपूर येथे त्यांनी दीपनारायणसिंह यांच्या घरी मुक्काम केला होता. तेव्हा लाजपत पार्क येथे गांधीजींची एक सभा झाली. त्याला खूप गर्दी होती आणि गर्दीतील अनेकांना गांधीजींचा ऑटोग्राफ हवा होता. तेव्हा गांधीजीनी ५ -५ रुपये घेऊन अश्या सह्या दिल्या आणि त्यातून जमलेला सारा पैसा भूकंपपिडीतांसाठी दिला. या सभेत गांधीजीनी उपस्थितांना मदतीचे आवाहन केले होते.

Leave a Comment