चेहऱ्यावर नका जाऊ राव! हा आहे हाडाचा शिक्षक


आपले विद्यार्थी चांगले नागरिक व्हावेत, त्याच्यावर योग्य संस्कार व्हावेत यासाठी झटणारे खरे हाडाचे शिक्षक आपण अनेकदा पाहतो आणि त्यांच्या दिसण्याबद्दल आपल्या मनात एक प्रतिमा आपोआप तयार झालेली असते. पण चेहऱ्यावरून कुणाची परीक्षा करू नये हेच खरे. फिलीपिन्सच्या मोन्ते सिटी सेंट जोन्स डेल स्कूल मधील एक शिक्षक सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. त्याचे नाव आहे फ्रान्सिस, वय आहे २३ आणि तो दिसतो पाच वर्षाच्या मुलासारखा निष्पाप.

बालवाडीच्या विद्यार्थ्यांना फ्रान्सिस शिकवतो आणि तो या मुलांच्यात बसला असेल तर तो शिक्षक आहे असे लक्षात सुद्धा येत नही. केवळ चेहराच नाही तर त्याचे हात, आवाज, केस सुद्धा लहान मुलांप्रमाणे आहेत. तो उभा राहिला असेल तरच या मुलांपेक्षा वेगळा दिसतो कारण त्याची उंची आहे ५ फुट. त्याच्या चेहऱ्यावर तरुणाईची जाणीव करून देणाऱ्या दाढी मिशा नाहीत. पण त्याबद्दल फ्रान्सिसला कोणताही खेद अथवा खंत नाही.


फ्रान्सिस सांगतो, मला दाढी मिश्याची गरज वाटत नाही. तो जेव्हा शिक्षण घेत होता तेव्हाही त्याच्या मित्रांनी त्याला यावरून कधीच चिडविले नाही. माझ्यात सर्व हार्मोनल चेंज झाले आहेत. त्यामुळे मी अगदी नॉर्मल आहे आणि एक चांगला शिक्षकही. माझ्या विद्यार्थ्यांनी मला शिक्षक समजण्यापेक्षा भाऊ समजावे असे वाटते.

अर्थात मी शिक्षक आहे हे समजावे म्हणून मी ढगळ कपडे घालतो, चष्मा लावतो. लेदर शूज घालतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना अतिशय गंभीरपणे शिकवतो. अनेकजण मला लिटील बॉय म्हणून चिडवतात पण मी लक्ष देत नाही. माझी हिम्मत ते तोडू शकत नाहीत उलट अश्या टीकेची मला मदत होते. त्यामुळे मी अधिक बिनधास्त झालो आहे आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार असतो. माझा चेहरा हीच माझी वेगळी ओळख आहे.

Leave a Comment