सौरमंडळातील एका ग्रहाला देण्यात आले भारताच्या या गायकांचे नाव

आपल्या सौरमंडळातील एका ग्रहाला भारतीय शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे नाव देण्यात आले आहे. इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल युनियन (आयएयु) ने एका ग्रहाचे नाव ‘पंडित जसराज ‘ठेवले आहे. पुर्ण देशासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. नासाने या ग्रहाची स्थिती दर्शवणारे एक ग्राफिक देखील जारी केले आहे.

(Source)

आयएयुने ही माहिती 23 सप्टेंबर 2019 ला दिली आहे. नासाच्या ग्राफिक्समध्ये म्हणण्यात आले आहे की, संगीताला समर्पित आयुष्य. हा सन्मान मिळवणारे पंडित जसराज पहिलेच भारतीय संगीतज्ञ आहेत.

(Source)

हा ग्रह सौरमंडळात मंगळ आणि ज्युपिटरच्या ग्रहाच्या मधे आहे. या ग्रहाचा शोध 11 नोव्हेंर 2006 ला लागला होता. तेव्हा याला ‘2006 VP32’ आणि नंबर ‘300128’ हे नाव देण्यात आले होते.

(Source)

एखाद्या ग्रहाला नाव देण्यासाठी अनेक नियम आहेत. पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित असलेल्या पंडित जसराज यांचे नाव देण्यामागचे कारण खूपच रोचक आहे. या ग्रहाचा जो नंबर आहे. तो 300128 असा आहे. जर हा नंबर उल्टा केला तर तो 280130 होता. हीच 28-01-30 पंडित जसराज यांची जन्मतारीख देखील आहे. ज्या ग्रहाला पंडित जसराज यांचे नाव देण्यात आले आहे तो एक मायनर प्लॅनेट आहे.

(Source)

मायनर प्लॅनेट म्हणजे असा ग्रह जो सुर्याची चक्कर मारतो. मात्र त्यांचा आकार छोटा असतो. मात्र याची गुरूत्वाकर्षण शक्ती जास्त नसते.

Leave a Comment