हॉलीवूडला सापडल्या रानू मंडल, बेघर महिलेचा ओपेरा गातानाचा व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपुर्वीच रेल्वे स्थानकावर गाणे गाणाऱ्या रानू मंडल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील एका बेघर महिलेचा ओपेरा गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लॉस एंजेलिस पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक बेघर महिला मेट्रो स्टेशनवर ओपेरो गात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, 5 लाखांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

लाँस एंजेलिस पोलिसांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, 4 मिलियन लोक लॉस एंजेलिसला घर मानतात. 4 मिलियन स्टोरीज, 4 मिलियन वॉईसेस.. कधीतरी असे अचानक थांबून एखाद्याचा आवाज ऐकावा. असे सुंदर ऐकायला मिळते.

या ओपेरा गाणाऱ्या महिलेचे नाव इमिली झामोर्का असून, त्या 52 वर्षांच्या आहेत. त्या प्रशिक्षित व्हायोलिन वादक आणि पियानो वादक आहेत. 24 वर्षांच्या असताना त्या रशियासोडून अमेरिकेला आल्या. झामोर्का यांनी ओपेराचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. त्यांना आजार असल्याने या अडचणीतून जावे लागत आहे. त्याआधी शिक्षक होत्या.

झोमार्का यांनी सांगितले की, मी मला हवे तेथे झोपते. काही लोकांना माझ्याबद्दल वाईट वाटते. पण मला कोणाचेही ओझे बनायचे नाही. त्या सांगतात मी सबवे वर गाते. कारण मला हा आवाज आवडतो.

 

Leave a Comment