रग्बी वर्ल्ड कपसाठी या दोन पठ्ठ्यांनी 20,000 किमी सायकल चालवली

20 सप्टेंबरपासून जापानमध्ये रग्बी वर्ल्ड कप सुरू झाला असून, हा वर्ल्ड कप 2 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. रग्बीबद्दल युरोपीय देशांमध्ये मोठी क्रेज आहे. रग्बीप्रती असलेल्या वेडामुळे लंडनमधील दोन मित्र जेम्स ओवंस आणि रोन रूटलँड हे दोघे लंडनवरून जापानला पोहचले आहेत. दोघांचा हा प्रवास मनोरंजक आहे.

जेम्स आणि रोनने जवळपास 20,093 किलोमीटर प्रवास सायकलने केला आहे. लंडन ते जापानला पोहचण्यासाठी दोघांना 230 दिवस लागले. या दरम्यान त्यांनी 27 देशांचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान दोघांनी फंड जमा करत जवळपास 59 लाख रूपये जमवले. आता हे पैसे ते लहान मुलांच्या शिक्षणासाठी देणार आहेत.

जेम्सने सांगितले की, सायकलिंग आणि फिटनेसचे महत्त्व सांगणाऱ्या आमच्या कोचसाठी हा सर्वात मोठा विजय आहे. आमची ही मेहनत केवळ आमच्या पुरतीच मर्यादित राहू नये, यासाठी आम्ही फंड जमा केला आहे व हे पैसे लहान मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येतील. यामुळे आमचा आवडीचा खेळ रग्बीचा देखील प्रचार होईल.

जेम्स आणि रोन फेब्रुवारीमध्ये लंडनवरून या प्रवासाला निघाले होते. जेम्सचे वडिल हे रोनच्या कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर आहेत. यामुळे जेम्स आणि रोन या दोघांची मैत्री झाली.

Leave a Comment