पहिला फोल्डेबल फोन भारतात 1.65 लाखाला लाँच

सॅमसंग कंपनीने बहुप्रतिक्षित गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.  भारतात गॅलेक्सी फोल्डची किंमत 1,64,999 रूपये आहे. या फोनचे एकच व्हेरिएंट असून, यामध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे, फोनचे वैशिष्ट्य म्हणजे याचा डिस्प्ले फोल्ड करता येतो. अनफोल्ड केल्यानंतर हा फोन टॅबलेट म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. फोल्ड केल्यानंतर हा फोन खूपच छोटा दिसतो.

हा फोन काळ्या रंगामध्ये मिळेल. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. एक  16 मेगापिक्सल, दुसरा 12 मेगापिक्सल आणि तिसरा देखील 12 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी यात ड्युल कॅमेरा देण्यात आला आहे. एक 8 मेगापिक्सल आणि दुसरा 10 मेगापिक्सल आहे.

(Source)

गॅलेक्सी फोल्डची प्री बुकिंग 4 ऑक्टोंबरपासून सुरू होईल आणि विक्री 20 ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे.  सॅमसंग ई-शॉप आणि कंपनीच्या रिटेल स्टोर्समध्ये प्री बुकिंग करता येईल.

यामध्ये असलेल्या दोन स्क्रीन व्यतरिक्त हा फोन सर्वसामान्य फोन प्रमाणेच आहे. डिस्प्लेमध्ये एमोलेड पॅनेल वापरण्यात आला आहे. फ्रंट डिस्प्ले खूपच छोटा असून, तो 4.6 इंच आहे. तसेच फुल एचडी देखील नाही.

(Source)

दुसरा डिस्प्ले 7.2 इंच असून, यात Infinity Flex Dynamic AMOLED पॅनलचा वापर करण्यात आला आहे. ज्याचे रिज्योलुशन QXGA+ आहे. हा स्मार्टफोन Android 9 Pie बेस्ड One UI वर चालतो. या स्मार्टफोनममध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

(Source)

स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी युएसबी टाइप सी आहे. यामध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेली 4,380 एमएएचची बॅटरी देण्यात आलेली आहे.

Leave a Comment