दिल्ली ते मुंबई आता 10 तासात

लवकरच आता दिल्ली ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. रेल्वे मंत्रालय मिशन रफ्तार अंतर्गत रेल्वेचा वेग वाढवत असून, यामुळे प्रवास जलद होणार आहे. याचबरोबर इंफ्रास्ट्रक्चरमध्ये देखील बदल होणार आहे. राजधानी एक्सप्रेसमधून दिल्ली-मुंबई आणि दिल्ली कोलकाता प्रवास करणाऱ्यांच्या वेळेत बचत होणार आहे.

सध्या दिल्ली ते मुंबईला राजधानी एक्सप्रेसमधून जाण्यासाठी 15 तास 30 मिनिटे लागतात. मात्र काही दिवसांनी हा प्रवास 10 तासांमध्ये पुर्ण होईल. या रेल्वेचा सध्याचा वेग ताशी 130 किलोमीटर आहे. रेल्वे मंत्रालय नवीन इंफ्रास्ट्रक्चरसाठी 6,806 कोटी रूपये खर्च करणार आहे.

याचबरोबर दिल्ली ते हावडा जाण्यासाठी सध्या 17 तास लागतात. मात्र यामध्ये देखील बदल होऊन हा प्रवास केवळ 12 तासांचा असेल. दिल्ली ते कोलकात्याला जाणारा मार्गावर सरकार 6,685 कोटी रूपये खर्च करणार आहे. जुलैमध्ये देखील रेल्वेने 261 ट्रेनचा वेग 110 मिनिटांनी वाढवला होता.

Leave a Comment