699 रूपयात फोन आणि 700 चा डेटा, जिओची धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओने जिओफोन दिवाली ऑफरची घोषणा केली आहे. याअंतर्गत तुम्ही जिओफोन केवळ 699 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही जुना फोन एक्सचेंज करण्याची देखील गरज नाही.

जिओचा फोन 699 रूपयांना मिळत आहे, म्हणजे तुमची 800 रूपयांची बचत होईल. हा एक फिचर फोन आहे. मात्र यामध्ये गुगल आणि व्हॉट्सअॅप वापरता येते.

(Source)

दिवाळी 2019 ऑफरमध्ये जिओ फोन खरेदी करणाऱ्याला कंपनी 700 रूपयांचा डेटा देखील देणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला रिचार्ज करावे लागेल. पहिल्या 7 रिजार्जनंतर कंपनीकडून ग्राहकाच्या खात्यात 99 रूपयांचा डेटा जमा करण्यात येईल.

ही ऑफर जिओच्या सर्व फोनवर लागू आहे. जिओ फोनच्या फिचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये QWERTY कीबोर्ड आणि रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

(Source)

यामध्ये 2000 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, काई ओएसवर हा फोन चालतो. या फोनमध्ये ड्युल कोर प्रोसेसर आहे.

(Source)

या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले देण्यात आला असून, रिअर कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे व यात एसडी कार्ड देखील लावता येते.

Leave a Comment