नदीत पडलेला आयफोन, 15 महिन्यानंतर ही होता सुरू

फोन पाण्यात पडला तर ? अगदी काही मिनिटात हजारोंचे नुकसान होईल. मात्र एका युट्यूबरला 15 महिन्यांपुर्वी पाण्यात पडलेला आयफोन सापडल्यानंतर ही तो फोन चालू होता. या घटनेचा व्हिडीओ नगेटनॉगिन (nuggetnoggin)  युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. युट्यूबर मायकल बेनेथने नदीमधून 15 महिन्यानंतर हा फोन काढल्यानंतर त्याच्या खऱ्या मालकाला हा फोन परत केला.

युट्यूबर बेनेथ एटिस्टो नदीमध्ये पोहत असताना त्याला हा फोन सापडला. बेनेथचे युट्यूबवर 7.4 लाख स्बस्क्राईबर्स आहेत. बेनथला लहान असल्यापासूनच अशाप्रकारे काहीतरी शोध घेण्याची सवय आहे. अशाप्रकारे सापडलेल्या वस्तूंचे व्हिडीओ बेनेथ युट्यूबवर अपलोड करत असतो.

व्हिडीओमध्ये दिसते की, बेनेथला आयफोन हा एका प्लास्टिक कव्हरमध्ये सापडतो. त्याने फोनला पुन्हा चार्ज केल्यावर फोन चालू असतो.

व्हिडीओमध्ये हे देखील दाखवण्यात आले आहे की, बेनेथ फोनच्या खऱ्या मालकाला भेटून त्याला फोन परत देतो. व्हिडीओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत 1.84 लाख लोकांनी पाहिला असून, शेकडो कमेंट्स देखील आल्या आहेत. एका युजरने लिहिले की, हा फोन परत मिळाल्यावर मालक नक्कीच आनंदी झाला असेल.

Leave a Comment