नशाबंदी करणारे डॉ. क्लेबर यांना गुगल चा डुडलद्वारे सलाम

आज गुगलने एक खास डुडल बनवत मनोचिकित्सक डॉक्टर हरबर्ट डेविड क्लेबर यांच्या कार्याला सन्मानित केले आहे. ड्रग्सची सवय सोडण्यासाठी हरबर्ट क्लेबर मदत करत असे. त्यांनी नशा करण्याची सवय ही नैतिक अपयश नसून, उपचाराची स्थिती असल्याचे म्हटले. आजच्याच दिवशी 23 वर्षांपुर्वी नॅशनल अॅकेडमी ऑफ मेडिसनच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली होती, या निमित्ताने गुगलने त्यांचे डुडल बनवले आहे.

त्यांचा जन्म 19 जून 1934 ला पेन्सिलवेनियामधील पिट्सबर्ग येथे झाला होता. डॉ. क्लेबर यांनी डार्टमाउथ कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले, त्यावेळीच त्यांची मनोविज्ञानामध्ये रूची वाढली. त्यांनी तीन वर्ष लोकांची ड्रग्सची सवय सोडवण्यासाठी मदत केली. मात्र नंतर त्यांच्या लक्षात आले की, या प्रकारच्या उपचारासाठी नवीन वैज्ञानिक रिसर्च गरजेचा आहे.

(Source)

डॉ. क्लेबर यांनी ड्रग्स व नशासंबंधित पदार्थांबद्दल राष्ट्रीय केंद्राची स्थापना केली. तर कोलंबिया विद्यापीठात मादक द्रव्याच्या सेवनाबाबत विभागाची देखील स्थापना केली.

त्यांनी दारू, कोकीन, हेरोइन यासारख्या गोष्टींची नशा असलेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी नवनवीन पध्दती विकसित करण्यासाठी काम केले. 5 ऑक्टोंबर 2018 ला त्यांचे निधन झाले.

 

Leave a Comment