श्रीलंकेच्या संघाला पाकिस्तानमध्ये देण्यात आलेल्या सुरक्षेची गंभीरने उडवली खिल्ली

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत श्रीलकेंच्या संघाला पाकिस्तानमध्ये देण्यात आलेल्या सुरक्षेबाबत खिल्ली उडवली आहे. श्रीलंकेचा संघ एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे.

गौतम गंभीरने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, एवढ्या वेळा काश्मीर काश्मीर केले की, कराचीला विसरूनच गेले.

हा व्हिडीओ पाकिस्तानी नागरिकाने रेकॉर्ड केल्याचे दिसत असून, व्हिडीओमध्ये पाकिस्तानी नागरिकच सुरक्षा व्यवस्थेची खिल्ली उडवत आहे. व्हिडीओमधील व्यक्ती कर्फ्यु लावून सामने खेळले जात आहे, असे म्हणत पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.

तब्बल 20 गाड्यांचा ताफा श्रीलंकेच्या संघाच्या सुरक्षेसाठी देण्यात आला आहे. श्रीलंकेचा संघ 10 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये खेळणार आहे. 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र पाक क्रिकेट बोर्डाने फुलप्रुफ सुरक्षा देण्याचे वचन दिले आहे.

 

 

Leave a Comment