एसबीआयचे ग्राहक असाल तर जाणून घ्या आजपासून बदलणारे हे 6 नियम

तुम्ही जर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे (SBI) ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून भारतीय स्टेट बँकेने कर्ज, चेक बुक, एटीएम, मिनिमम बँलेंस, आरटीजीएस आणि एनईएफटी सारख्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

(Source)

चेक बुकची पाने कमी –

एसबीआयने चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारात बदल केले आहेत. आता बचत खात्यावर एका आर्थिक वर्षात 25 च्या ऐवजी केवळ 10 चेक मोफत मिळणार आहेत. त्यानंतर 10 चेक घेण्यासाठी 40 रूपये द्यावे लागणार आहेत. याआधी मोफत चेक संपल्यानंतर 10 चेक घेण्यासाठी 30 रूपये द्यावे लागत होते. यामध्ये जीएसटी देखील वेगळा भरावा लागणार आहे.

(Source)

चेक रिटर्न आल्यावर लागणार 168 रूपये चार्ज –

एसबीआयने चेक रिटर्नच्या नियमांमध्ये देखील बदल केले आहेत. जर बाउंस व्यतरिक्त इतर कारणांमुळे चेक परत आला तर 150 रूपये व जीएसटी अतिरिक्त चार्ज द्यावे लागेल. जीएसटी पकडून हा चार्ज 186 रूपये असेल.

(Source)

एटीएम नियमांमध्ये बदल –

एक ऑक्टोंबरपासून एसबीआयच्या एटीएम चार्जमध्ये देखील बदल झाले आहेत. बँकेचे ग्राहक मेट्रो शहरांमध्ये एसबीआय एटीएममधून केवळ 10 वेळाच मोफत पैसे काढू शकतील. या आधी ही लिमिट 6 वेळा होती.

(Source)

कर्ज स्वस्त –

सणांच्या काळात एसबीआयच्या खातेदारांसाठी चांगली बातमी आहे. एसबीआयने एमएसएमआय, हाउसिंग आणि रिटेल लोनच्या सर्व प्लोटिंग रेट लोनसाठी एक्सटर्नल बेंचच्या स्वरूपात रेपो दर स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुक्ष्म, लघू उपक्रमांना फायदा होईल.

(Source)

मिनिमम बँलेस –

मेट्रो शहरातील खातेदारांसाठी बँकेने मिनिमम बँलेस रक्कम 3 हजार रूपये केली आहे. ही रक्कम आधी 5 हजार रूपये होती. याचबरोबर शहरी भागांमध्ये मिनिमम बँलेस न ठेवल्यामुळे लावण्यात येणारा चार्ज देखील कमी केला आहे. जर ग्राहकांच्या खात्यात 75 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम असेल तर 15 रूपये व जीएसटी अतिरिक्त भरावे लागेल. सध्या ही रक्कम 80 रूपये आहे. तर 50 ते 75 टक्के कमी रक्कम असल्यावर 12 रूपये चार्ज लागेल, सध्या हा चार्ज 60 रूपये + जीएसटी आहे.

(Source)

एनईएफटी आणि आरटीजीएस –

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर ( NEFT ) आणि रियल-टाइम ग्रॉस सेटलमेंट ( RTGS ) च्या शुल्कामध्ये देखील कंपनीने बदल केले आहेत. 10 हजार रूपयांपर्यंतट् एनईएफटीवर 2 रूपये + जीएसटी लागेल. तर दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल तर 20 रूपये व अतिरिक्त जीएसटी भरावी लागेल. आरटीजीएसवरून दोन ते 5 लाखांपर्यंत रक्कम पाठवण्यावर 20 रूपये व जीएसटी लागेल. पाच लाखांपेक्षाच्या अधिक रक्कमेवर 40 रूपये + जीएसटी लागेल.

Leave a Comment