भाजपकडून 125, तर शिवसेनेकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनाने युतीची काल घोषणा झाल्यानंतर आज भाजपने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर शिवसेने 70 जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. युतीत शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या आहेत. तर भाजप व मित्रपक्ष 164 जागा लढवणार आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – नागपूर दक्षिण पश्चिम, चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली आहे.  या यादीमध्ये एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचे नाव मात्र नाही. याचबरोबर शिवेंद्रसिंह राजे यांना जावळीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. नालासोपाऱ्यातून इन्काउंट स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी मिळाली आहे.

शिवसेनेच्या पहिल्या यादीतील उमेदवार –

नांदेड दक्षिण – राजश्री पाटील, मुरुड – महेंद्र शेठ दळवी, हदगाव – नागेश पाटील आष्टीकर, मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ, भायखळा – यामिनी जाधव, गोवंडी – विठ्ठल लोकरे, एरोंडेल/ पारोळा – चिमणराव पाटील, वडनेरा – प्रीती संजय, श्रीवर्धन – विनोद घोसाळकर, कोपर पाचकपडी – एकनाथ शिंदे, जापूर – रमेश बोरनावे, शिरोळ – उल्हास पाटील, गंगाखेड – विशाल कदम, दापोली – योगेश कदम, गुहागर – भास्कर जाधव, अंधेरी पूर्व – रमेश लटके, कुडाळ – वैभव नाईक, ओवला माजीवाडे – प्रताप सरनाईक, बीड – जयदत्त क्षीरसागर, पार ठाणे – सांदीपान भुमरे, शहापूर – पांडुरंग बरोला, नगर शहर – अनिलभैय्या राठोड, सिल्लोड – अब्दुल सत्तार, औरंगाबाद (दक्षिण) – संजय शिरसाट, अक्कलकुवा – आमशा पडवी, इगतपुरी – निर्मला गावित, वसई – विजय पाटील, नालासोपारा – प्रदीप शर्मा, सांगोला – शाबजी बापू पाटील, कर्जत – महेंद्र थोरवे, धन सावंगी – डॉ.हिकमत दादा उधन, खानापूर – अनिल बाबर, राजापूर – राजन साळवी, करवीर – चंद्रदीप नरके, बाळापूर – नितीन देशमुख, देगलूर – सुभाष सबणे, उमरगा लोहारा – ज्ञानराज चौगुले, डिग्रस – संजय राठोड, परभणी – डॉ.राहुल पाटील, मेहकर – डॉ.संजय रायमुलकर, जालना – अर्जुन खोतकर, कळमनुरी – संतोष बांगर, कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर, औरंगाबाद (पश्चिम)- संजय शिरसाट, चंदगड (कोल्हापूर)- संग्राम कुपेकर, वरळी – आदित्य ठाकरे, शिवडी – अजय चौधरी, इचलकरंजी – सुजित मिणचेकर, राधानगरी – प्रकाश आबिटकर, पुरंदर – विजय शिवतारे, दिंडोशी – सुनील प्रभु, जोगेश्वरी पूर्व – रवी वायकर, मागठाणे – प्रकाश सुर्वे, गोवंडी – विठ्ठल लोकरे, विक्रोळी – सुनील राऊत, अनुशक्ती नगर – तुकाराम काटे, चेंबूर – प्रकाश फतारपेकर, कुर्ला – मंगेश कुडाळकर, कलिना – संजय पोतनीस, माहीम – सदा सारवणकर, ळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, पाचोरा – किशोर पाटील, मालेगाव – दादाजी भुसे, सिन्नर – राजाभाऊ वझे, निफाड – अनिल कदम, देवळाली – योगेश घोलप, खेड – आळंदी – सुरेश गोरे, पिंपरी – गौतम चाबुकस्वार, येवला – संभाजी पवार, नांदगाव – सुहास खांडे.

महाराष्ट्रात 21 तारखेला मतदान पार पडणार आहे, तर 24 तारखेला मतमोजणी होईल.

 

Leave a Comment