या सरकारने वाटले गरिबांसाठी 6 लाख टिव्ही

सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार आणि नेतेमंडळी अनेक वचन देत असतात. मात्र सर्वच नेते दिलेली वचन पाळतातच असे नाही. चीनच्या कम्युनिस्ट सरकारने मात्र गरिबांना चक्क 32 इंचाचे 6 लाख 20 हजार टिव्ही मोफत वाटले आहेत.

चीनमध्ये कम्युनिस्ट सरकारचा आज 70 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने चीनी सैन्य पिपल्स लिबरेशन ऑर्मीने बिजिंगमध्ये संचलन केले. यामध्ये 15 हजार सैनिकांनी भाग घेतला होता. याशिवाय या संचलनामध्ये चीनने 160 विमान, 580 टँक आणि अन्य शस्त्र साठ्याचे देखील प्रदर्शन केले.

कम्युनिस्ट सरकारचे 70 व्या वर्धापन दिनानिमित्ताने करण्यात आलेले कार्यक्रम बघणे कोणीही चुकवू नये. यासाठी सरकारने गरिबांना टिव्ही वाटले. सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी पंतग, स्काय लालटेन आणि कबुतरांना अडण्यास देखील प्रतिबंध घालण्यात आला होता.

70 व्या वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रपती शी जिनपिंग देशाला संबोधित करणार आहेत.

 

Leave a Comment