बापरे ! 60 वर्षीय महिलेने 1 मिनिटात इतक्या इडल्या खाऊन जिंकली स्पर्धा

एका मिनिटामध्ये तुम्ही किती इडल्या खावू शकता एक, दोन किंवा तीन. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एका 60 वर्षीय वृध्द महिलेने एका मिनिटात 6 इडल्या खाल्या आहेत. या महिले कर्नाटकमधील म्हैसूर येथे पार पडलेल्या इडली इटिंग स्पर्धेत एका मिनिटात 6 इडल्या खात ही स्पर्धा जिंकली.

सर्वात जलद इडली खाण्याची ही स्पर्धा म्हैसूरमध्ये दसरा सणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा खास महिलांसाठी होती. स्पर्धकाला एक मिनिटामध्ये जास्तीत जास्त इडल्या खायच्या होत्या. अनेक महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र सरोजम्मा यांनी एका मिनिटात 6 इडल्या खात सर्वांचा पराभव केला.

दरवर्षी सप्टेंबर अथवा ऑक्टोंबरमध्ये दसरा फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत असेत. म्हैसुरमध्ये हा फेस्टिवल खुपच लोकप्रिय आहे.

 

 

Leave a Comment