वयाच्या नव्वदीत लतादीदींंची इन्स्टाग्रामवर एन्ट्री


स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी २८ सप्टेंबर रोजी वयाची नव्वदी पार करतानाच इन्स्टाग्रामवर एन्ट्री केली आहे. लतादीदी सोशल मिडियावर व त्यातही ट्विटरवर खुपच अॅक्टीव्ह आहेत मात्र त्यांचे इन्स्टाग्राम अकौंट नव्हते. आपल्या पाहिल्याच पोस्ट मध्ये लतादीदी म्हणतात, ‘नमस्कार, प्रथमच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्याशी जोडली जात आहे.’ याबरोबर एक फोटो दिदींनी पोस्ट केला आहे.

लतादीदींनी फोटो पोस्ट करताच काही तासात त्यांना ४६ हजारावर फॉलोअर मिळाले असून त्यांच्या चाहत्यांनी दिदींचे इन्स्टाग्रामवर मनापासून स्वागत केले आहे. काही जणांनी वेलकम ताई असे म्हटले आहे. दिदींचे अकौंट अजून व्हेरीफाईड झालेले नाही असेही समजते.

या निमित्ताने त्यांची बहिण मीना खडीकर यांनी दीदींच्या बद्दल बोलताना लतादीदी स्वतः ट्विट करते, सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह आहे असे सांगितले. तसेच अजूनही त्या रोज दिवसभर गाणी गुणगुणतात पण आता तानपुऱ्यावर रियाज करत नाहीत. घरातील मुलांना अजूनही स्वतः विविध पदार्थ करून खाऊ घालतात असे सांगितले.

Leave a Comment