फॅशन जगात या चिमुकलीचा बोलबाला


सध्या फॅशन जगतात एका चिमुकलीचा फारच बोलबाला होत असून निर्विवादपणे तो तिचा हक्क आहे असे म्हणता येतील. नऊ वर्षाच्या या चिमुरडीने केवळ फॅशन जगालाच नाही तर सर्व क्षेत्रातील लोकांना एक आदर्श घालून दिला आहे आणि जिद्द काय असते याचे दर्शन घडविले आहे. डेसिमे दिमेत्रे असे या मुलीचे नाव आहे.

डेसिमे दिड वर्षाची होती तेव्हा तिच्या गुढघ्याखालच्या पायांना संसर्ग झाला आणि तिचे गुढघ्याखालचे दोन्ही पाय कापावे लागले. डबल अँप्युट झालेली डेसिमे पहिलीच मॉडेल आहे. तिने पॅरीस विक मध्ये रँप वॉक केला. डेसिमेचे वडील सांगतात, आज पाय असते तर तिचे आयुष्य कदाचित वेगळे झाले असते. आज ती जे करतेय ते तिने कदाचित केले नसते. मात्र दोन्ही पाय गमावून तिने हिम्मत हारली नाही तर स्वतःला सर्व परिस्थितीसाठी तयार केले आहे.


डेसिमे प्रथम चालायला शिकली, उडी मारायला शिकली आता तर ती काही स्टंटसुद्धा करते. एका हाताने बॉडी फ्लिप करते. तिचा हा बिनधास्तपणा लोकांना आवडतोय. बर्मिघम अॅवॉर्ड मध्ये तिला चाईल्ड ऑफ करेज या सन्मानाने गौरविले गेले आहे. तिच्यासोबत अनेकजण फोटो काढून घेतात. गेले दीड वर्ष ती मोडेलिंग करते आहे. रँप वॉक दरम्यान सुद्धा ती स्टंट करते आणि तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते आहे. तिला पाय नाहीत पण म्हणून ती असहाय्य नाही. डेसिमे रनिंग सुद्धा करते.

Leave a Comment