नोवाक जोकोविचचे सुमोला कुस्तीचे आव्हान


जागतिक कीर्तीचा टेनिसपटू नोवाक जोकोविच याचे जपान मध्ये सुमो पहिलवानाबरोबर कुस्ती खेळतानाचे तीन व्हिडीओ एटीपी टूरने शेअर केले आहेत. सोमवारी नोवाकने टोक्यो येथे सुमो सोबत कुस्ती खेळण्याचा एक प्रयत्न केला तो पूर्ण फसला. मग त्याने या पैलवानांकडून सुमो कुस्तीची कौशल्ये शिकून घेतली. नोकाव जपान ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी टोक्यो येथे आला आहे.


या संदर्भात नोकाव म्हणतो, एका सुमोला मी पूर्ण ताकद लावून मागे ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो जागचा हलला सुद्धा नाही. त्यामुळे मी त्याच्यासमोर कुणीच नाही हे कळले. त्याच्या मानाने मी खुपच अशक्त आहे. मी आणखी काही किलो वजन वाढवले तर कदाचित त्यांच्याविरुध्द कुस्ती करू शकेन. एका फाईट मध्ये नोवाकने रेफरीची भूमिका बजावली.हे पहिलवान दिसायला बोजड दिसतात पण खूप चपळ आहेत.

नोवाक सांगतो, लहानपणी तो त्यांच्या वडिलांबरोबर सुमो योकोजुना अकेबोनो याची कुस्ती पाहत असे. १९९३ मध्ये तो परदेशी जन्मलेला पहिला ग्रँड चँपियन सुमो होता. सुमो बरोबर प्रत्यक्ष भेट व्हावी अशी नोवाकची इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली. एका सुमोचे किमान वजन २५० किलो असते असेही समजते.

Leave a Comment