असे नेते आणि अशी अफेअर्स


एखाद्या देशाचा पंतप्रधान किंवा बडा नेता जेव्हा अफेअर किंवा लफडे करतो तेव्हा त्यासंदर्भातले अनेक खरे खोटे किस्से दीर्घकाळ चर्चेत राहतात. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जोन्सन सध्या याच कारणाने चर्चेत असले तरी अश्या प्रकारची चर्चा होणारे ते काही पहिलेच नेते नाहीत. बोरीस यांच्या गर्लफ्रेंडने नुकतेच बोरीस मेयर होते तेव्हा त्यांचे मॉडेल जेनिफर अकुरी बरोबर प्रेमसंबंध होते हे गुपित उघड केले आहे आणि त्यामुळे बोरीस चर्चेत आहेत. अर्थात बोरीस यांच्या या मैत्रिणीने त्यात काही गैर नाही असे सुनावले आहे.


अर्थात बडे नेते आणि त्यांची अफेअर यात सर्वाधिक गाजलेले प्रकरण म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि व्हाईट हाउस मध्ये कर्मचारी असलेली मोनिका लुविन्स्की यांचे प्रेमसंबंध. अर्थात क्लिंटन यांना एकाचवेळी अनेक मैत्रिणी होत्या असेही सांगितले जाते. इटलीचे ७५ वर्षीय माजी पंतप्रधान सल्बियो बालुस्कोनी यांना तरुण आणि टीनएज मुलींच्यात खुपच रस होता आणि त्यांची ही सारी प्रकरणे लोकांना माहिती होती. सल्बियो सत्तेवरून पायउतार झाले आणि ती सारी प्रकरणे चव्हाट्यावर आली.


लीबियाचा तानाशाह मुअम्मर गडाफी हा तर सतत त्याच्याभोवती अविवाहित आणि सुंदर महिला रक्षकांचा ताफा घेऊन फिरत असे. तर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर यांचा मुलगा बिलावल आणि पाकिस्तानच्या माजी मंत्री हीना यांच्यातील प्रकरण अजून चर्चेत आहे. हीना विवाहित आहेत मात्र त्या बिलावलसाठी पतीला सोडचिट्ठी देण्यास तयार आहेत असे सांगितले जाते.

ब्रिटीश राजघराण्याचा राजकुमार हॅरी याचीही अशीच कहाणी आहे. त्याचे अनेक मुलींसोबत संबंध होते आणि त्याने स्वतःचे न्यूड फोटो शेअर केले होते. आता तो अमेरिकन अभिनेत्री मेगन मर्केल सोबत विवाहबद्ध झाला असून त्यांना एक मुलगा आहे.

Leave a Comment